डोंबिवली / शंकर जाधव : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने शनिवार २५ तारखेला सायंकाळी 6 वाजता डोंबिवली पूर्वेकडील रोटरी भवन येथे वोकेशनल एक्सेलन्स ॲवाॅर्ड सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ञ रो.डॉ.उल्हास कोल्हटकर उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात डॉ.शुभदा जोशी, राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू मनीषा डांगे आणि केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील यांना ॲवाॅर्ड प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती रो.विजय डुंबरे यांनी दिली.