होप इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुंबईत पाऊल

 

~ होप एक्स्पेरिअन्स सेंटर - ‘स्टार ई व्हील्स’चे उद्घाटन ~

ठाणे : पारंपारिक हिंदू नववर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक असलेला सण गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी होप इलेक्ट्रिकने होम एक्स्पेरिअन्स सेंटर ‘स्टाइ ई व्हील्स’च्या उद्घाटनासह मुंबईमध्ये त्यांची प्रमुख इलेक्ट्रिक मोटारसायकल होप ओएक्सओ लाँच केली. पाचपाखाडी, ठाणे येथे सुरू करण्यात आलेल्या होप एक्स्पेरिअन्स सेंटरचे उदघाटन ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केले. याप्रसंगी माजी महापौर माननीय मीनाक्षी शिंदे, होप इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक व सीओओ निखिल भाटिया, स्टार ई व्हील्स’च्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी देशपांडे, श्री प्रशांत देशपांडे, होप इलेक्ट्रिकचे सीएमओ  रजनीश सिंग आणि होपचे विभागीय विक्री प्रमुख रवी किशोर उपस्थित होते.

होप इलेक्ट्रिक मोबिलिटीचे सह-संस्थापक व सीओओ  निखिल भाटिया म्हणाले, ‘‘भारतीय रस्त्यांवरील मोबिलिटी व्यासपीठांना स्मार्ट व शाश्वत नवीन ऊर्जा उत्पादनांत परिवर्तन करण्यामध्ये आमची भूमिका बजावत आम्हाला ठाणे येथील विकासासाठी आमच्या सहयोगी म्हणून डायनॅमिक महिला उद्योजिका पल्लवी देशपांडे यांच्या समर्थनाचा आनंद होत आहे. लाँच होण्यापूर्वीच शहरामध्ये आमच्या भागीदाराच्या माध्‍यमातून ओएक्सओला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आनंद होत आहे. या इलेक्ट्रिक मोटारसायकलने जवळपास ५० ग्राहक मिळवले आहेत.’’

होप एक्स्पेरिअन्स सेंटर – स्टार ई व्हील्सच्या मालक पल्लवी देशपांडे म्हणाल्या, ‘‘होप इलेक्ट्रिकसोबत सहयोग करण्याचा आणि ठाण्यामध्ये त्यांची स्मार्ट, भविष्यवादी इलेक्ट्रिक वेईकल उत्पादने लाँच करण्याचा हा अभिमानास्पद क्षण आहे. कनेक्टेड वैशिष्ट्ये व डायनॅमिक परफॉर्मन्स असलेली स्टायलिश होप ओएक्सओ इलेक्ट्रिक मोटारसायकल १५० किमीची रेंज देते आणि ९० किमीहून अधिक टॉप स्पीड तरूणांमध्ये खूप लोकप्रिय ठरले आहे. आम्ही प्रबळ होप ईव्ही समुदाय निर्माण करण्यास उत्सुक आहोत.’’

होप ओएक्सओ लोकांच्या राइड करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल. ई-मोटारसायकलमध्ये ७२ व्होल्टचे व्होल्टेज आर्किटेक्चर, ५.२ केडब्ल्यू / ६.२ केडब्ल्यूची* मोटर पॉवर (सर्वोच्च) आणि १८५ एनएम / २०० एनएमचा* अधिकतम टॉर्क (चाकाजवळ) आहे. मोटारसायकलमध्ये बीएलडीसी हब मोटर, सिनुसोइडल एफओसी वेक्‍टर कंट्रोल आणि राइडिंग मोड्स जसे इको-पॉवर-स्पोर्ट व रिव्हर्स मोड आहे.

Post a Comment

Previous Post Next Post