मनसेची डेडलाईन संपली... तर पालिका गप्प...
डोंबिवली / शंकर जाधव : १३ मार्च रोजी मनसेने डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा यासाठी पालिका प्रशासनाला १५ दिवसाची मुदत दिली होती. डेडलाईन संपूनही फेरीवाले हटले नसल्याने मनसेचे स्टेशन परिसरात `डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्याची डेडलाईन संपली. आता आमच्याकडे दुर्लक्ष करा`असे बॅनर लावले. याची चर्चा सुरु झाली असली तरी फेरीवाल्यांनी मात्र आमची जागा सोडणार नाही. असा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे पालिका प्रशासन फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याचे यावरून दिसून येते.त्यामुळे आता मनसे विरुद्ध फेरीवाला असा संघर्ष पाहावयास मिळणार आहे.