कारवाईला नागरिकांचा विरोध
डोंबिवली / शंकर जाधव : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेचे पथक बुधवारी कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरातील टपऱ्यावर कारवाई गेले होते.मात्र येथील नागरिकांनी कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांना घेराव घातला.पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी करत टपरीचालकाने ठिय्या आंदोलन केले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पथकाने 17 ते 18 टपऱ्यावर कारवाई सुरू केली .मात्र या जागेप्रकरणी न्यायालयात केस सुरू आहे,ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.नागरिकांचा विरोध पाहता याठिकाहून पथकाने तेथून काढता पाय घेतला .तर याबाबत सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी या प्रश्नबाबत आयुक्तांशी चर्चा करणार असून आयुक्तांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरात लेखक जागेवर सतरा ते अठरा टपऱ्यात गेला अनेक वर्षांपासून आहेत.मात्र ही जागा खाजगी मालकीची असल्याचा दावा करण्यात आला. महापालिकेचे पथक या टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. या कारवाईला टपरी चालकांनी जोरदार विरोध केला.ही अन्यायकारक बेकादेशीर कारवाई असल्याचे सांगत कारवाई करण्यास गेलेल्या सहाय्यक आयुक्त यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली टपरी चालकांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. गेलं पस्तीस वर्षांपासून आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत आहोत या जागेचं भोई भाडे देखील आम्ही देत आहोत आमच्याकडे पावती आहे , जागेसंदर्भात न्यायालयीन प्रकरण सुरू आहे .ही कारवाई अन्यायकारक आहे, बेकायदेशीर आहे असा आरोप या टपरी चालकांनी केला . तर याबाबत सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी या प्रश्नबाबत आयुक्तांशी चर्चा करणार असून आयुक्तांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.