कोळशेवाडी पोलिसांनी नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या
डोंबिवली ( शंकर जाधव ) :
क्लासमधून घरी परतनाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली.या प्रकरणी विशाल गवळी याला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.धक्कादायक बाब म्हणजे विशाल ने या मुलीचा पाठलाग केला. एका कोपऱ्यात तिला खेचत नेले तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. पीडित मुलीने तिची सुटका करत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गवळी याच्या विरोधात याआधी देखील बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. विशाल गवळीला या आधी तडीपार देखील करण्यात आले होते. विशाल याचा माज इतका आहे की पत्रकारांनी पत्रकारांच्या कॅमेराकडे बघून त्याने victory ची साईन दाखवली. एक अल्पवयीन विद्यार्थिनी तिचा क्लास आटोपून घरी परतत होती. यावेळी विशाल याने तिचा पाठलाग केला आणि तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन विद्यार्थिनींना त्याला प्रतिकार केला आणि त्याच्या तावडीतून ती निसटली. तिच्यासह तिच्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली. तातडीने आरोपी विशाल गवळीला अटक केली. विशालला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असता त्याने केलेल्या कृत्याविषयी जरा देखील पश्चाताप न करता दोन बोटे उंचावून विजयाची खून दाखवली. विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.