उद्यान एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग

 


बंगळुरू : मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसला भीषण आग लागली. बंगळुरू येथील सांगोली रायण्णा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर ही आग लागली. आग एवढी भीषण होती की संपूर्ण स्थानकावर धुराचे लोट पसरले होते.  या रेल्वेमधून प्रवासी उतरल्यानंतर जवळपास दोन तासांनी या रेल्वेला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.  सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झाली नाही.   ही आग कशामुळे लागली असावी याची चौकशी तज्ज्ञांकडून केली जात आहे. 

ही गाडी मुंबईहून बंगळुरू दरम्यान, धावते. ही एक्स्प्रेस केएसआर या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभी होती. सकाळी जवळपास ७.३० च्या सुमारास या गाडीमधून धुराचे लोट येऊ लागले. त्यानंतर या एक्सप्रेसमध्ये आग पसरल्याचे समोर आले. उद्यान एक्स्प्रेसच्या बी १ आणि बी २ या दोन कोचमध्ये आग लागली. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात स्थानकावर पसरले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी येत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने उग्र रूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळवतांना अडचणी येत होत्या. या घटनेमुळे स्थानकावर गोंधळ उडला. फ्लॅटफॉर्मवरील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.



Post a Comment

Previous Post Next Post