ओंजळ फाउंडेशनचा शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात

  


डोंबिवली ( शंकर जाधव ) 

     ओंजळ फाउंडेशन (डोंबिवली ) सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयरे येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. या शाळेतील १४० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी ह्या शाळेत शिक्षण घेतात.त्यामुळेच संस्थेने ह्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देऊ केला आहे.

ह्या शाळेला शालेय साहित्याचे वाटप करण्याचे हे संस्थेचे तिसरे वर्ष आहे. ह्या उपक्रमात शोभना शिंदे,अनुजा बिरमोळे,दीपिका कोळंबे,आकांक्षा बिरमोळे हे संस्थेचे सदस्य तसेच शाळेचे शिक्षक उपस्थित होते.माझे मित्र हरी पराडकरही उपस्थित होते. आमच्या ह्या उपक्रमात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या आर्थिक मदतीचा हात देऊन सहभागी होऊ शकता असे आवाहन संस्थापक अध्यक्ष अरविंद बिरमोळे यांनी केले आहे.






Post a Comment

Previous Post Next Post