DRM च्या हजेरीत सरकत्या जिन्याचे झाले लोकार्पण
दिवा : मुंब्र्यात वंदे भारत या नवीन रेल्वेला झालेल्या अपघातामुळे मुंबईतील रेल्वेचे DRM मुंब्रा भेटीवर आले असताना ते पुढे दिव्यात येऊन फाटकात होणारी प्रवाशांची ट्रॅक क्रासिंग बघितल्याबरोबर त्यांनी फाटक बंदचे फर्मान काढले.
दिवा रेल्वे स्थानकात पूर्वेला तयार झालेल्या सरकत्या जिन्याचे लोकार्पण करण्यासाठी DRM दिव्यात आले होते. तेव्हा दिवा फाटकात प्रवाशांची होणारी ये जा बघता तसेच तेथे होणारे अपघात, मृत्यू यांची वाढणारी संख्या हे रेल्वेच्या डोकेदुखीवर उपाय म्हणून फाटक बंदचे फर्मान DRM ने काढले.
लोकार्पण झालेल्या झालेल्या सरकत्या जिन्यावरुन जाण्यास दिवेकरांनी प्राधान्य दिले असल्याने रेल्वे क्रॉसिंगमुळे होणाऱ्या रेल्वे अपघाताला १०० टक्के आळा बसणार असल्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
दिवा रेल्वे स्थानकात वाढणाऱ्या अपघातांची संख्या जास्त असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी दिवा रेल्वे फाटक कायमचे बंद व्हावे यासाठी दिव्यातील दिवा प्रवाशी संघटना, संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना, इतर प्रवाशी संघटना आणि जागृत नागरिक मागणी रेल्वे प्रशासनाकडे करत आहेत. त्या सर्वांनी अनेक सूचना, समस्या रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात दिल्या होत्या.
2022 च्या डिसेंबर मध्ये मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवा स्थानकाची पाहणी केली होती. दिव्यात वाढलेली प्रवाशी संख्या तर फाटकात होणारे मृत्यू. तसेच दिवा स्थानकातील सर्व समस्यांचा आणि सोयीसुविधांचा आढावा त्यावेळी घेण्यात आला होता. त्यावेळी वाढीव सरकते जिने, शौचालय, तिकिट खिडक्या यां प्रश्नांवर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे लक्ष वेढले होते. त्याचा परिणाम दिव्यात कोपरच्या बाजूृला दिव्यातील पूर्वेला एक तिकिट घर उघडले असून 5, 6 फालाटावर शौचालयाचे काम सुरु असून या स्थानकात 6 सकरते जिने लागणार आहेत. त्यातील 2 जिने आता सुरु झाले असून 3 सरकत्या जिन्यांचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.
फलाट 1, 2 होणारा नवीन सरकता जिना
(DRM ) मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी लोकार्पण सोहळ्या वेळी दिवा स्थानकाला दिलेल्या भेटीत फलाट क्रमांक एक व दोन वरील मुंबई दिशेकडील शेवटच्या टोकांना फलाटावर चढण्या- उतरण्यासाठी असलेले रॅम काढून त्या ठिकाणी रेलिंग बसवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, त्याठिकाणी रेलिंग बसवण्यात आली असून, दिवा रेल्वे फाटक संपूर्णतः रेल्वे प्रवासी क्रॉसिंगमुक्त झाला.
पश्चिमेतील सरकता जिना आठवडाभरात सुरु होणार
दिवा पश्चिमेला तयार होत असलेला सरकता जिना लवकर सुरु व्हावा यासाठी नागरिक आग्रही आहेत. हा सरकता जिना एका आठवड्यात प्रवाशांसाठी खुला होणार असे दिवा प्रबंधक मनोज गुप्तांनी सांगितले. फलाट क्रमांक 1, 2 धिम्या गाड्यांसाठी प्रवाशांची गर्दी जास्त असल्यामुळे मुंबई दिशेकडे ही एक स्वयंचलित सरकता जिन्याची नागरिकांची मागणी लवकरच पूर्ण होणार असून तो कुठे लावावा त्याची जागा निश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवा स्थानकाची पाहणी केली. मुंबई दिशेने जाणारी गाडी अर्धा डब्बा मागे थांबवून त्याच्या पुढे सरकता जिना लागणार आहे.
चेंगराचेंगरीची शक्यता
अचानक बंद केलेल्या फाटकामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने आधी कोणतीही पूर्व सूचना प्रवाशांना देण्यात आली नाही. दोन सरकते जिने सुरु झाल्यामुळे DRM नीं फाटक बंदचा घेतलेला निर्णय हा प्रवाशांच्या जिवावर बेतू शकतो. सगळे प्रवाशी हे घरी जाण्यासाठी ठाण्याकडील पहिल्या पादचारी पूलाचा वापर करतात. कारण त्या पूलाच्या खालीच असणाऱ्या रिक्षा स्टँडमुळे. पण त्यावर दोन ते तीन भिकारी, 5 ते 6 कुत्र्यांचे आणि गर्दुल्यांचे बस्तान असते. त्यामुळे प्रवाशी या पुलाचा कमीकमी वापर करायचे पण आता फाटक बंद असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याचा वापर करावा लागतो. तसेच एकाच वेळी जर 1, 2, 3 जर मुंबई कडून गाडी आल्यास एकच गर्दी या पहिल्या पूलावर उसळते. अन् तेथे असणारे सरकते जिने बंद असल्यास प्रवाशांचा खुपच गोंधळ उडतो. त्या पूलावर उतरताना प्रत्येक प्रवाशी हा जीव मुठीत घेऊन उतरत असतो.
पोलीस बळ कमी
फाटक बंद झाल्याने नागरिकांना पूलाचा वापर करावा लागत आहे. त्यात कोणतीही सूचना न देता फाटक बंद केल्यामुळे प्रवाशी फाटकात घुसतात. त्यांना बाहेर काढायला तेथे पोलीस तैनात केले आहेत. त्यामुळे आधीच पोलीसांची संख्या कमी असल्याने रेल्वेच्या मुंबई दिशेकडील पहिल्या पूलावर एकच गर्दी उसळते. पण ती गर्दी हाताळायला पोलीस कमी पडतात. दिव्यात पोलीस संख्या वाढवणे गरजेचे आहे.