डोंबिवली ( शंकर जाधव ) : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनानुसार स्वच्छ भारत अभियानांतर्गत 'एक तास स्वच्छतेसाठी' उपक्रमांतर्गत कल्याण पूर्व १४२ विधानसभा मतदारसंघातील चक्कीनाका ते तिसाई मंदिर, श्री मलंग रोड, कोलशेवाडी म्हसोबा चौक व जरीमरी मंदिर अशा विविध ठिकाणीआयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रमदान केले.
स्वच्छता अभियानात आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत महानगरपालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त थोरात, हेमा मुंबरकर, सविता हिले आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था कल्याणचे शिक्षक व विद्यार्थी तसेच पतंजली योग शिबीर संघटना तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, अभिमन्यु गायकवाड, विक्रम तरे, माजी नगरसेविका मोनाली तरे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Tags
महाराष्ट्र