डोंबिवली ( शंकर जाधव ) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान या घोषणेचे प्रणेते लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी डोंबिवलीत राष्ट्रवादीच्या वतीने त्याच्या पुतळ्यास व प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डोंबिवली शहरअध्यक्ष सुरेश जोशी, दीपक ठाकूर, गोवर्धन भोईर, रमेश दिनकर, शशिकांत म्हात्रे, निलेश पाटील, मिलिंद भालेराव, भावना राठोड यासह अनेकजन उपस्थित होते.यावेळी सुरेश जोशी म्हणाले,आपल्या देशासाठी संपूर्ण आयुष्य ब्रिटीशांशी संघर्ष केला असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आम्ही नमन करतो तसचे लाल बहादूर शास्त्री यांनी देशासाठी आयुष्यभर झगडले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
Tags
महाराष्ट्र