वाशिंद मधील एक महाविद्यालयातील विद्यार्थी रविवारी कामानिमित्तर कल्याण शहरात आला होता.काम संपल्यानंतर तो घरी जात असताना त्याने कल्याण स्टेशन वरील स्कायवाँक परिसरात उभा असलेल्या एका फेरीवाल्याकडून वस्तू विकत घेतली. पण ती वस्तू खराब असल्याने त्याने त्या फेरीवाल्याला परत देत आपले पैसे मागितले. मात्र फेरीवाल्याने पैसे देण्यास नकार देत 'तुम मराठी लोग ऐसेही होते हो' असे म्हणत त्यात तरुणाला शिवीगाळ केली. 'माझ्या भाषेवरून जाऊ नको नाहीतर, मी मनसेकडे जाऊन सर्व प्रकार सांगीन असे बोलल्यावर तेथील तीन ते चार फेरीवाल्यांनी विद्यार्थ्याला मारहाण करत 'किसको भी लाओ, कोण क्या उखाडता है देखेंगे' असे म्हणत शिवीगाळ केली.
त्या विद्यार्थ्याने ही घटना कल्याण पूर्वेत मनसे शाखेत जाऊन मनसैनिकांना घडलेला प्रकार सांगितला. संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेशन परिसरातील स्कायवॉक परिसरात जाऊन विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या त्या फेरीवाल्यांना चोप दिला.
Tags
महाराष्ट्र