- आमदार व कल्याण पूर्व सायकलिस्ट क्लब यांच्यावतीने सामाजिक संदेश
डोंबिवली ( शंकर जाधव ) : सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आज गांधी जयंती निमित्ताने जनसामान्यात क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने माननीय आमदार गणपत गायकवाड व कल्याण पूर्व सायकलिस्ट क्लब यांच्यावतीने सामाजिक संदेशपर भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत सायकलस्वारांनी क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी फलकावर संदेश लिहून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. सर्व सहभागी सायकल पटूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या रॅलीत १० वर्षाच्या युवकांंपासून ७० वर्षाच्या वयोवृद्धांनी सहभाग घेतला होता. या रॅलीसाठी हिरकणी सायकल ग्रुप, कल्याण पूर्व सायकलिस्ट क्लब, कल्याण पूर्व क्रीडा शिक्षक संघटना यांनी मोलाचे सहकार्य केले.
या प्रसंगी कल्याण जिल्हा भाजपचे अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्षा सविता देशमुख तसेच दीपक गायकवाड, रवी गायकवाड, गुड्डू खान, कल्याण पूर्व सायकलींग क्लबचे सचिव अविनाश ओंबासे, संतोष शेलार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.