डोंबिवली ( शंकर जाधव ) : काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व रेल्वे स्टेशन स्कायवॉकवरून एक गरोदर महिला रुक्मिणी बाई हॉस्पिटल येथे जात असताना प्रसूतीच्या वेदना होऊन स्कायवॉक वरच नवजात बाळाला जन्म दिला. प्रसंगावधान दाखवत रिक्षाचालक संजय जगताप व त्यांचे इतर रिक्षाचालक सहकारी यांनी सदर महिलेस व बाळाला सुखरूप खासगी रुग्णवाहिनीतून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.या रिक्षाचालकांचा कल्याण वाहतूक विभाग स.पो.आ. मंदार धर्माधिकारी, कोळशेवाडी वाहतूक उपविभागाचे प्रभारी व.पो.नि रवींद्र क्षीरसागर साहेब यांनी कोळसेवाडी वाहतूक उप विभाग कार्यालय, चक्कीनाका येथे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन कौतुक केले.
Tags
महाराष्ट्र