सोशल मिडीयाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सुटणार .
डोंबिवली ( शंकर जाधव ) आपल्या जीवनाच्या अनुभवातून इतरांना सल्ला व माहिती देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्याअनेक समस्या असतात. या समस्या सांगण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांअन अनेकांच्या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. आता ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून `आपकी काठी` ॲप मदतीचा हात पुढे आला आहे. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीण मधील भूमिपुत्र योगेश पाटील या ॲचे ब्रेड अॅम्बेसिडर आहेत. तसेच खेलो इंडिया वूमन लीग मध्ये निवड झालेल्या ठाणे शहर स्पोटर्स किकबॉसिंग असोसिएशनच्या खेळाडूंचे कासा बेला गोल्ड असोसिएशन व उत्सव समितीच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात पाटील यांच्या हस्ते इव्हिपमेंटस ग्लोव्हज ट्रॉफी व मानसन्मान करण्यात आला.
वय वाढल्यावर ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्या समोर येतात. यासाठी त्यांना अनेकांचे सल्ले हवे असतात तर कधी समस्या सोडविण्यासाठी फिरावे लागते. आता ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या हक्काचे `आपकी काठी` ॲप आला आहे. याॲपच्या माध्यमातून थेट समस्यांवर तोडगा काढला जाणार आहे. आरोग्यविषयक समस्या जास्त असल्याने यावरही उपाय शोधण्याचाप्रयत्न होणार असल्याचे या ॲपचे ब्रेड अॅम्बेसिडर कल्याण ग्रामीण मधील योगेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कासा बेला गोल्ड असोसिएशन व उत्सव समितीच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता. तसेच ठाणे शहर स्पोटर्स किकबॉसिंग असोसिएशनच्या शुर्या गोरे, पुष्याजा सरकार, शरवी गावडे, इवा बिजू, निवेदया श्रीकुमार आणि पप्रीशिता धर्मपाल या खेळाडूंचे मनसे डोंबिवली महिला शहरअध्यक्षा मंदा पाटील , कल्याण ग्रामीण मधील योगेश पाटील. अरुण जांभळे. अनिल मानेकर, तेजस शेंद्रे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. या खेळाडूंना किकबॉसिंगचे कीट देण्यात आले. यावेळी प्रशिक्षक शुभाम मिश्राम हेहि उपस्थित होते.