आजदेपाड्यात साईराज मित्र ममंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव

 


डोंबिवली( शंकर जाधव ) नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरबा या पारंपारिक खेळासाठी सर्वजण आतुरतेने वाट पहात असतात. साईराज मित्र मंडळ अध्यक्ष जनार्दन काळण यांनी मंडळाच्या माध्यमातून देवीची प्राणप्रतिष्ठा केली असून नवरात्रोत्सव साजरा केला आहे. रोज संध्याकाळी देवीची आरती आणि पूजाअर्चा असा साधा कार्यक्रम होत आहे.प्रत्येक वर्षी धुमधडाक्यात गरबा आणि दांडिया व विविध कार्यक्रमसह बक्षिसांची रेलचेल मंडळ करीत असते. नवरात्रोत्सवात अष्टमीला होमहवन करण्यात आले. त्यानंतर देविभक्तांसाठी साईराज मित्र मंडळ माध्यमातून भंडारा (महाप्रसाद) ठेवण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष जनार्दन काळण म्हणाले, साईराज मित्र मंडळाच्या वतीने अनेक समाजिक उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सवात भक्तगण देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. आजदेपाडा आणि आजदे गाव येथील नागरिक भंडारा (महाप्रसाद) लाभ घेतात.



Post a Comment

Previous Post Next Post