२ तारखेला डोंबिवलीत मराठा समाजाचे साखळी उपोषण

डोंबिवलीत साखळी उपोषण करून पाठींबा देण्याचा निर्णय 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील लेवा भवन सभागृहात नियोजन बैठक पार पडली. येत्या २ तारखेला रामनगर येथे सकाळी ११ वाजता साखळी उपोषण होणार आहे.या उपोषणास बसणाऱ्यांची आधी वैद्यकीय तपासणी होऊनच उपोषणास बसता येईल.इंदिरा चौकात हे उपोषण केले जाणार आहे.

या बैठकीत वैभव राणे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी डोंबिवलीत साखळी उपोषण करून या मराठा योद्धाला पाठींबा देऊ. साखळी उपोषण आवश्यक आहे असे ज्येष्ठ नागरिक तात्या माने यांनीही यावेळी सुचविले.लाखो मोर्चे काढले पण गालबोट लागले नाही.यावेळीही असेच झाले पाहिजे असेही माने म्हणाले.तर वर्षा जगताप म्हणाल्या, यापूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते.यावेळी लक्ष्मण मिसाळ, धनंजय चाळके, राजेश शिंदे, विवेक खामकर, यांसह अनेक मराठा बांधव या बैठकीत उपस्थित होते.

ह.भ.प.रामेश्वर काळे म्हणाले, आपल्या समाजाला अभिमान आहे की असा योद्धा मिळाला.समाज त्यांचा सदैव ऋणी राहील.स्वराज्य घडविण्यासाठी मराठा समाज पुढे होता.मग आज हा समाज पाठीमागे का आहे.समाजाचे मोठे नेतृत्व पाटील करत आहे. या बैठकीत आलेला प्रत्येक मराठा तितकाच महत्वाचा आहे.यावेळी धनंजय चाळके म्हणाले,इंदिरा चौकात येथे साखळी उपोषण होईल.हे उपोषण शांततेच्या मार्गाने होईल असे या बैठकीत सांगण्यात आले.पुढे विवेक खामकर म्हणाले, मरेन पण वाकणार नाही हे मनोज जरांगे पाटील यांनी सिद्ध करून दाखवले.आपल्याला आरक्षणासाठी का गरज आहे सरकारने समजून घ्यावे.




Post a Comment

Previous Post Next Post