कल्याण ( शंकर जाधव) : कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेने अनधिकृत कारवाई करताना प्रवेश कमान तुटल्याने स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातला. शुक्रवारी पालिका कर्मचाऱ्यांनी कल्याण पश्चिम येथील मिलिंद नगर परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली. कारवाई सुरू असताना चुकून प्रवेश कमान तुटल्याने स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती.
स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या विरोधात रस्त्यावरती नारेबाजी केली. सदर परिस्थितीची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त राजेश सावंत पोहचले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सहाय्यक आयुक्त सावंत यांनी कमान दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. याबाबत सहाय्यक आयुक्त सावंत म्हणाले, याठिकाणी कमानीच्या बाजूला अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना जेसीबीच्या चुकून धक्का लागल्याने कमान वाकली. कमानी व्यवस्थित करण्याबाबत ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. कमिनीचे काम तात्काळ सुरू होऊन कमान पूर्वीप्रमाणे होईल.