कल्याण ( शंकर जाधव ) : भाजप (bjp) पक्षाचे कल्याण जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काँग्रेस (congress) नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी व तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी ( kalyan banerji) यांच्या प्रतिमेस जोडे मारा आंदोलन केले होते. या संदर्भात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत कल्याण येथील कोळसे वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.
याबाबत याबाबत काँग्रेसचे नागरी विकास सेल प्रदेश अध्यक्ष नवीन सिंग यांनी भाजपच्या आंदोलनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. अशाच प्रकारचे आंदोलन जर काँग्रेसने केले तर कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास काँग्रेसला जबाबदार ठरू नका असे सांगितले. यावेळी काँग्रेस कल्याण जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे, कांचन कुलकर्णी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.