महिलांसाठी हळदी- कुंकू
दिवा, (आरती मुळीक परब) : महालक्ष्मी महिला फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव तर महिलांसाठी हळदी- कुंकू ठेवण्यात आले होते.दिवा शहरात या एकमेव महिला फाऊंडेशन मार्फत महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. फाउंडेशन मार्फत मागील तीन वर्षांपासून दहावी/ बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व महिलांसाठी हळदी- कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत असतो.
त्याचप्रमाणे महिलांसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मदत होते. या महिलादिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्याचप्रमाणे वर्षातून महिलांसाठी देवदर्शन सहल (पिकनिक) काढण्यात येते. कोरोना काळात ज्या देवरूपी डॉक्टरांनी रुग्णाची सेवा केली त्यांचा सत्कार देखील फाऊंडेशन मार्फत करण्यात आला. असे अनेक उपक्रम संस्थापिका सोनम संतोष देसाई व अध्यक्ष सौ. विनिता विनोद लाड सर्व कमिटी मेंबर, सदस्य, सभासद यांच्या सहकार्याने राबविले जातात.