डोंबिवली रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने १५१ किलो लाडू वाटप

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : अयोध्येला श्री प्रभूरामचंद्रांचा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली. हा आनंद व्यक्त करत डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात भाजप डोंबिवली रिक्षा चालक संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांना आणि नागरिकांना १५१ किलो लाडू वाटप करण्यात आले. यावेळी भाजप कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यासंह दत्ता माळेकर, संजय देसले यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शहरी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनाही लाडू दिले.

    यावेळी भाजप कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे म्हणाले, आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी दिवाळी आहे. ५०० वर्षाची प्रतीक्षा संपली असून राममंदिर उभा राहण्यामागे हजारो त्याग व बलिदान आहे. आज भाजपचा नव्हे ते सकल हिंदू समाजाच्या वतीने देशभर रॅली,कार्यक्रम, दीपोत्सव,ढोल-तश्या माध्यमांतून आनंदो साजरा केला आहे. डोंबिवली रिक्षा युनियनेही लाडू वाटप केले आहे. कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले, डोंबिवली रिक्षाचालक -मालक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली रिक्षाचालकांनाव कामगारांना लाडू दिले. आज भारताला आनंद होत आहे.तर भाजप पदाधिकारी दत्ता माळेकर म्हणाले, दोन दिवसांपासून रिक्षाचालक आनंद व्यक्त करत आहेत. सर्व रिक्षांना श्रीराम ध्वज लावण्यात आले.





Post a Comment

Previous Post Next Post