भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याचा ठाणे शहर काँग्रेसकडून तीव्र निषेध
ठाणे, : काॅग्रेस (Congress) चे राष्ट्रीय नेते राहुल गांधी ( Rahul gandhi) यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भाजप (Bjp) च्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा ठाणे शहर काॅग्रेसच्या (Thane city congress) वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पक्ष जिथे जिथे काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करेल तिथे काँग्रेसचा एकूण एक कार्यकर्ता नव्याने उभारी घेऊन त्याचा निषेध करेल, असे शहर काॅग्रेस अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण (Adv Vikrant Chavan) यांनी म्हटले.
ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी स्टेशन रोड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काॅग्रेस अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करित जोरदार घोषणा दिल्या. याप्रसंगी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष अँड. विक्रांत चव्हाण यांनी सागितले की, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोठी सर्व जनतेला आवाहन करतात की राम मंदिराचा उत्सव सर्वत्र साजरा करा, जवळच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करा आणि त्याच प्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात येते असा दुजाभाव कशासाठी करीत आहेत? असा सवाल करत भारतीय जनता पक्ष जिथे जिथे काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करेल तिथे काँग्रेसचा एकूण एक कार्यकर्ता नव्याने उभारी घेऊन त्याचा निषेध करेल असे सांगितले.
याप्रसंगी शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, काँग्रेस नेते रविंद्र आंग्रे महिला अध्यक्षा स्मिता वैती, रेखा मिरजकर, सेवादल अध्यक्ष शेखर पाटील, प्रवक्ते राहुल पिंगळे, प्रदेश सदस्य जे. बी. यादव, प्रदिप राव, सुखदेव घोलप, राजेश जाधव, शकीला शेख, निशिकांत कोळी, रमेश इंदिसे, शैलेश शिंदे, रविंद्र कोळी, मंजूर खत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे (Manoj shinde) यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पार्टीचे नेते पूर्णपणे बिथरले असून संविधानात्मक व लोकशाही मार्गाने निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेला हल्ला म्हणजेच लोकशाही संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करित त्यानी कितीही प्रयत्न केले तरी भारत जोडो न्याय यात्रा ही निश्चित केलेला टप्पा पार पडेल असे सागितले.