कोकणच्या वगनाट्याने जिंकली दिवेकरांची मने


 दिवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यात चाकरमान्यांची वाढती संख्या बघुन येथे कोकणातील विविध लोकनाट्य, वगनाट्य, भजन, दशावतार असे कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे मागच्या वर्षी हाऊसफुल्ल झालेल्या प्रयोगानंतर चाकरमान्यांसाठी पुन्हा दुसरा नवीन नाट्यप्रयोग दिव्यात ओमकार चाळ मित्र मंडळ दिवा-मुंबई (ठाणे) निर्मित वगनाट्यासहित बहुरंगी नमनाचा प्रयोग काल ग्लोबल शाळेच्या मैदान पार पडला. ते बहुरंगी नमन बघण्यासाठी दिवेकरांनी तोबा गर्दी केली होती.

ओमकार चाळ मित्र मंडळ दिवा- मुंबई (ठाणे) निर्मित श्री. छत्रपती शंभूराजे संघटना दिवा शहर यांच्या सहकार्याने स्त्री पात्रांनी नटलेले "कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन" नाट्यप्रयोग संगीतमय गण, श्रृंगारिक गवळण सह राधाकृष्णाची प्रेमलीला सोबत पेंद्या- सुदामाची विनोदी धम्माल आणि काल्पनिक चित्तथरारकर वगनाट्य "अमरप्रेम" याने चाकरमान्यांना खिळवून ठेवले. वगनाट्य लेखक- प्रदिप रेवाळे, दिग्दर्शक- अजय ओर्पे, गौवळण लेखक - प्रशांत कदम/ प्रथमेश भुवड, नमन प्रमुख- सचिन शिगवण, अमित गोमाणे, सुशिल दहिवळकर आणि संपूर्ण ओमकार चाळ कलामंचने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या नाट्यप्रयोगास समाजसेवक महेंद्र कडवईकर, अशोक सरफरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तर श्री. छत्रपती शंभूराजे संघटना, दिवा शहर अध्यक्ष राजेश पाटील, समाजसेवक चरणदास म्हात्रे आणि माजी नगरसेविका सौ. दर्शना म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्यदिव्य कार्यक्रमाचा चाकरमान्यांनी आनंद घेतला.



Post a Comment

Previous Post Next Post