डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील स्टार कॉलिनी भूमिका इंटरप्राजेस येथे कोकण फिनकॅंप को-ऑप.बँक शाखेच्या उद्घाटन शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजप कल्याण लोकसभा नंदू परब, कल्याण ग्रामीण सरचिटणीस रविंद्र पाटील, भाजप डोंबिवली शहर उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे,गणेश विद्यामंदिरचे अध्यक्ष मोहन पाटील, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक अधिकारी मनीष सहानी, विधी इंटरप्राजेस संचालक अमर बनसोडे, गोरखनाथ म्हात्रे, रितिक महाले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
.
यावेळी शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील म्हणाले, बँकेने जे डोंबिवलीत रोपटे लावले आहे त्याचे वटवृक्ष व्हावे आणि या बँकेच्या माध्यमातून जनतेलाउत्तम सेवा मिळावी अशी अशा व्यक्त करतो.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पाटील म्हणाले, डोंबिवलीत कोकण फिनकॅंप को- ऑप. बँकेची शाखेची शाखा ( डीएसए ) सर्विस एजन्सी सुुुरू झाली आहे.
या बँकेतील खातेदारांना विदेशातून ऑनलाईन मोबाईल टेक्नोलॉजी लोकापर्यत पोहोचविणार आहे.या बँकेचा विस्तार महाराष्ट्रात सुरू आहे.