महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी



डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड कल्याणकर तुमचे स्वागत करीत आहोत', 'भावी आमदार' असे बॅनर कल्याण पूर्वेत लावल्यात आल्याचे दिसते.तर शिवसेना कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड हे माजी नगरसेवक भावी आमदार असेही बॅनर झळकत आहे.

  २ तारखेला उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती.यात महेश गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा तर राहुल पाटील यांच्या शरीरातून दोन गोळ्या काढण्यात आले. असून गेले १४ दिवसांपासून ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये महेश गायकवाड व त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर उपचार सुरू होते.

गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या असल्याने दुपारी त्यांना रुग्णालयातून डीचार्ज देणार येणार आहे. गायकवाड हे उपचारानंतर घरी परतत असल्याने महेश गायकवाड व राहुल पाटील त्यांचे कार्यकर्ते व समर्थकांकडून दुपारी जंगी स्वागत करत येणार आहे.'भावी आमदार' असे लिहिलेले बॅनर लावल्याने शहरात याची चर्चा सुरू आहे.



Post a Comment

Previous Post Next Post