डोंबिवली (शंकर जाधव) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात भाजी मार्केट मित्र मंडळ व्यापारी संघटना व दोस्ती ग्रुप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी नागरिकांना अल्पोपहार व सरबत वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शैलेश थोरात, उपाध्यक्ष लखन गायकवाड, खजिनदार पंकज शिरसाट, अभय राणे, प्रमोद जाधव,सतीश गौतम, बाळा ठाकूर,नवाब आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष शैलेश थोरात म्हणाले, यंदाचे आमचे दुसरे वर्ष असून दरवर्षी आम्ही विविध कार्यक्रम राबवत असतो व यापुढेही आम्ही असेच कार्यक्रम करू.