दिवा स्टेशनचा कायापालट केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण


दिवा, (आरती मुळीक परब) : कल्याण लोकसभेतील दिवा शहरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

रेल्वेच्या सुविधा पुरविण्यासह दिव्यासारख्या स्टेशनचा कायापालट करण्याचे काम केंद्र सरकारने केलं, असं याप्रसंगी ठामपणे सांगितलं. गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामं झाली. रिझर्वेशन काऊंटर, पाचवी सहावी लाईन, दिव्यात फाटक बंद करून उड्डाणपूल उभारणे अशी कामे मागच्या १० वर्षात केल्याचं सांगत दिव्यातले १० वर्षांपूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते यात मोठा फरक आहे. १० वर्षात दिव्यातली परिस्थिती बदलली असून महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळेच हे शक्य झाले. 


तर यापुढे दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणारी प्रत्येक गाडी थांबवण्यासह दिवा सीएसटी फास्ट लोकल, एसी लोकल सुरू करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. तसेच दिव्यातलं डम्पिंग बाहेर नेण्याचा शब्द पूर्ण केला असून मुंब्रा वाय जंक्शन पूल, ऐरोली काटई मार्ग, मुंब्रा उड्डाणपूल यामुळे प्रवास देखील वेगवान झाल्याचं यावेळी सांगितलं. ही मोठ्या प्रमाणात झालेली कामं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र मोदींजींनाच पंतप्रधान करायचं असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची आवश्यकता असल्याचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी सर्वांना आवाहन केले.

याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, निलेश पाटील, ॲड आदेश भगत, उमेश भगत, दीपक जाधव, अमर पाटील,  दिपाली भगत, अर्चना पाटील,  सरिता मढवी, साक्षी मढवी, गणेश मुंडे, चरण म्हात्रे, सौ. दर्शना म्हात्रे, भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, आरपीआयचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे साहेबराव सुरवाडे, दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, कैलास पाटील, गोपीनाथ म्हात्रे, प्रेमनाथ पाटील, समीर चव्हाण, सपना भगत, वैभव आलिमकर, चंद्रकांत आलिमकर, चंद्रभागा म्हात्रे, ब्रह्माशेठ पाटील, आदेश भगत, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामान्य नागरिकांची डॉ. श्रीकांत शिंदे सोबत सेल्फी काढण्यासाठी मेळाव्याला चढाओढ लागली होती. यावेळी शिंदेंनी थांबून सर्व महिला, पुरुष, तरुण वर्ग व लहान मुले यांच्या सोबत संवाद साधला. तेव्हा सर्वांनी आंनदाने शुभशीर्वाद दिले.



Post a Comment

Previous Post Next Post