दिव्यातील उबाठा पक्षाच्या युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप


दिवा, (आरती मुळीक परब) : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरातील युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख सदानंद थरावळ, कल्याण लोकसभा युवा अधिकारी कल्याण जिल्हा प्रतिक पाटील, उप युवा जिल्हाधिकारी स्वप्निल पावशे व कल्याण ग्रामीण विधानसभा अधिकारी सुरज जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. 

दिवा शहरातून युवानेते सुमित सुभाष भोईर व दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५३ युवासैनिकांची पदनियुक्ती करण्यात आली. यावेळी युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. त्या प्रसंगी कल्याण तालुका अधिकारी जयेश म्हात्रे, अंबरनाथ तालुका अधिकारी प्रदीप मढवी, डोंबिवली (पूर्व) शहर अधिकारी प्रसाद टुकरल, उप तालुका अधिकारी आवेश गायकर, दिवा शहर सचिव उमेश राठोड, उपशहर अधिकारी अक्षय म्हात्रे यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post