वसई अ‍ॅडव्होकेटस् असोसिएशन अध्यक्षपदी अ‍ॅड.दर्शना त्रिपाठी

 



वसई अ‍ॅडव्होकेटस् असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर !

 अ‍ॅड.सुरेश कामत व अ‍ॅड.अनिश कलवर्ट यांची उपाध्यक्षपदी निवड

वसई, ( सुहास जाधव) : वसई न्यायालयातील वसई अ‍ॅडव्होकेटस् असोसिएशन या वकील संघटना कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सर्वांनुमते अ‍ॅड. दर्शना त्रिपाठी यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष पद हे अ‍ॅड. सुरेश कामत व अ‍ॅड. अनिश कलवर्ट यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत विशेष म्हणजे सदरची ही कार्यकारणी बिनविरोध जाहीर करण्यात आली. या कार्यकरणी मध्ये सर्वश्री  सचिव अ‍ॅड.नवोदित गुजर, सहसचिव अ‍ॅड.समीर घरत, अ‍ॅड.गुंजन कोटक असून खजिनदार पदी अ‍ॅड.हरिष गौर यांची निवड करण्यात आली आहे. 

एकूणच  या कार्यकारिणी सदस्यांमध्ये अ‍ॅड.चेतन कुर्वे, अ‍ॅड.अ‍ॅश्ली कुशेर, अ‍ॅड.प्राची कोलासो, अ‍ॅड.पूजा नलावडे, अ‍ॅड.जयती घरत, अ‍ॅड.करिश्मा राऊत यांचा ही समावेश आहे. 

विशेष म्हणजे वसई न्यायालयातील ज्येष्ठ फौजदारी वकील अ‍ॅड.दिगंबर देसाई हे ॲडव्होकेट असोसिएट्सचे प्रवक्ते आहेत. 

दरम्यान शुक्रवारी खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध संपन्न झालेली ही  कार्यकारिणी जाहिर झाल्यानंतर माहिती देताना असो.चे प्रवक्ते अ‍ॅड.दिगंबर देसाई यांनी स्पष्ट केलं की, वसई न्यायालयाच्या नूतन इमारतीचा प्रश्न हा मागील दीर्घ काळापासून प्रलंबित आहे आणि न्यायालयाच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वसई न्यायालयातील अन्य वकील संघटनांशी समन्वय साधून सर्वसहमतीने एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल.तसेच  न्यायालयाच्या आताच्या इमारतीत आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तर शेवटी नव्या आणि ते ही बिनविरोध झालेल्या या  कार्यकारणीचं सहकारी वकिलांनी स्वागत केलं असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देऊ केल्या आहेत.

विशेष म्हणजे संघ ,संघटना, असोसिएशन म्हंटल की अध्यक्ष व अन्य पदासाठी निवडणूकीची व गटबाजीची  चुरस पाहायला मिळते मात्र ही निवडणूक अगदी साधेपणाने बिनविरोध निवड पद्धतीने संपन्न झाल्याने  वसई अ‍ॅडव्होकेटस् असोसिएशनने अन्य वकील संघांना  एकप्रकारे उदाहरण तथा नवा पायंडा घालून दिला आहे

Post a Comment

Previous Post Next Post