नवी दिल्ली : T२० विश्वचषक २०२४ साठी संघांची घोषणा करण्याची अंतिम तारीख १ मे आहे. त्यादृष्टीने संघांची घोषणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वप्रथम न्यूझीलंडने सोमवारी आपला संघ जाहीर केला. त्याचवेळी, आज मंगळवारी दक्षिण आफ्रिकेनेही आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिका बोर्डाने राखीव खेळाडू म्हणून २ खेळाडूंची नावेही जाहीर केली आहेत. त्याचबरोबर संघाची कमान एडन मार्करमकडे सोपवण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका T२० विश्वचषक संघ २०२४
एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेन्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिबेझ स्टॅम्ब्सी आणि ट्रिबेझ स्टॅम्ब्सी यांचा समावेश आहे.