शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा स्वागतात प्रवेश

 


जे. एम. एफ. संस्था संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिच्या विद्यार्थ्यांचे शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  जून महिन्यातला शाळेचा पहिला दिवस हा सर्वांच्याच आनंदाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. नवीन वर्ग, नवीन मित्र, नवीन वह्या पुस्तके आणि त्याचा नवीन कोरा सुगंध ह्या सर्व गोष्टींचे अप्रूप म्हणजे शाळेचा पहिला दिवस.आपला पाल्य नवीन गणवेश,घालून ,नवीन  दप्तर पाठीवर घेऊन शाळेत जाताना बघुन पालकांचा उर भरून येतो ,कदाचित त्यांना त्यांचेही दिवस आठवत असतील. १८ जून रोजी जे एम एफ संस्था संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर ह्या दोन्ही शाळेचा सुरू होण्याचा पहिला दिवस होता. सर्व शिक्षक वर्ग उत्साहाने विद्यार्थ्यांवर पुष्प टाकत  स्वागत केले.


      शिशुविहर ते दहावी पर्यंतचे सर्वच विद्यार्थी आपापल्या पालकांसोबत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊ लागली. सर्व शिक्षक वृंदांनी मुलांना व पालकांना तिलक लावून व पुष्प वर्षाव करून ढोल ताशांच्या गजरात त्यांचे प्रवेश दारातून शाळेच्या आवारात स्वागत केले. सर्व मुले आनंदाने उड्या मारत व कुतूहलाने होत असलेला स्वागत सोहळा बघत होती. प्रत्येक वर्ग शिक्षिकेने त्यांच्या मुलांना ' हासरा चेहरा ' (smily emoji)  त्यांचा गणवेश वर लावून हसत खेळत  त्यांचा हाताला धरून प्रांगणात आणले.  शाळेचे प्रवेशद्वार फुगे, फुले लावून सजवले गेले.रेड कार्पेट वरून सर्व विद्यार्थी प्रांगणात आले.त्यानंतर शाळेची नियमित प्रार्थना घेण्यात आली.  संस्थेच्या सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी शिशुविहार च्या सर्व विद्यार्थ्यांना आलिंगन  देऊन ' तुमच्या ह्या छोट्या पावलांच्या आगमनाने पुन्हा एकदा आपली शाळा  नाचून बागडून आनंदाने फुलून जाऊ दे ' असे म्हणून बालकांना त्यांनी चॉकलेट दिले.


       दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर परत पहिल्यासारखा तोच जल्लोष, तोच आवाज, ह्यामुळे जन गण मन शाळा चे प्रांगण आणि इमारत दणाणून गेले.संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील आगमन झालेल्या सर्व मुलांना  शाळेच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व स्वागत केले.




Post a Comment

Previous Post Next Post