हीयरक्लियरचे ठाण्यात नवीन क्लिनिक

 


~ श्रवणदोषांवर अत्याधुनिक उपचार मिळवणे झाले सोपे ~

ठाणे : अत्याधुनिक हीयरिंग केयर सोल्युशन्स देणारा ब्रँड हीयरक्लियरने ठाणे येथील हिरानंदानी इस्टेटमध्ये नवे क्लिनिक सुरु केले आहे. देशभरात अत्याधुनिक हीयरिंग केयर सोल्युशन्स उपलब्ध व्हावीत यासाठी हा ब्रँड महत्त्वाकांक्षी विस्तार करत आहे.

खूपच कमी लोकांना हीयरिंग सोल्युशन्स उपलब्ध होतात. ही समस्या दूर करण्यासाठी हीयरक्लियर ब्रँड वृद्ध लोकांमध्ये श्रवणदोष दूर करण्यासाठी काम करतो. संपूर्ण देशभरात पोहोचून, ज्यांना या सोल्युशन्सची गरज आहे त्यांच्यापर्यंत माहिती आणि पोहोच वाढवणे त्यांचा उद्देश आहे. ब्रँडच्या असे देखील लक्षात आले आहे की, श्रवणदोषांच्या बाबतीत मध्यमवर्गीय लोक जास्त जागरूक असतात आणि या समस्येचे निवारण करण्यासाठी पहिल्यापासून तयारी करतात. प्रगत आणि नवीन तंत्रज्ञान उपाययोजना स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. ठाणेमध्ये क्लिनिक सुरु करून या ब्रँडने त्या भागातील वयोवृद्धांना सेवासुविधा पुरण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे.

हीयरक्लियर इंडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विनीत नारंग यांनी सांगितले, " ठाण्यात नवीन क्लिनिकचा शुभारंभ केल्याने देशभर विस्तार करण्याचे आमचे मिशन मजबूत झाले आहे. हीयरक्लियरमध्ये आम्ही वयोवृद्धांसाठी प्रगत हीयरिंग केयर सोल्युशन्स उपलब्ध करवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि हा उद्देश पूर्ण करण्यासाठी ज्यांना या सोल्युशन्सची गरज आहे त्यांच्या घरांच्या जवळ अधिकाधिक क्लिनिक सुरु केली जात आहेत.नवीन क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर ब्रँडने पुढील ६ ते ९ महिन्यांमध्ये मुंबईमध्ये आणखी १२ क्लिनिक खोलून बाजारपेठेत आपले स्थान मिळवण्याची योजना तयार केली आहे."




आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी हा ब्रँड रिटेल डिस्ट्रिब्युशनचे विशाल नेटवर्क उभारण्यास प्राधान्य देत आहे. ग्राहकांना त्यांच्या घराजवळ ही सेवा उपलब्ध व्हावी आणि हीयरिंग केयर सुविधांचा सहजपणे लाभ घेता यावा यासाठी ब्रँड प्रयत्नशील आहे. अशा प्रकारे आपले स्थान मजबूत करण्यासाठी ब्रँडने लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि शिबिरे आयोजित करण्यासाठी आघाडीच्या हेल्थकेयर कंपन्या व रेसिडेंट असोसिएशन्ससोबत हातमिळवणी केली आहे.

आपल्या योजनेमध्ये ब्रँडने एका निश्चित वयानंतर ऐकण्याच्या क्षमतेमध्ये घट होत जाण्याच्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. वयोवृद्धांमध्ये श्रवण क्षमतेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे हे क्लिनिक तज्ञ ऑडिओलॉजिस्टचे मार्गदर्शन आणि सर्वसमावेशक कन्सल्टिंग सेवा ग्राहकांना प्रदान करेल. नियमित हीयरिंग टेस्ट्स आणि तपासणीसाठी ब्रँडने उपकरणांचे रिप्रोग्रामिंग आणि फाईनट्युनिंग या सेवा देखील प्रदान केल्या आहेत. त्यासोबतच नीट किंवा अजिबात ऐकू न येणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी त्यांच्या घरी सेवा प्रदान करण्यात देखील हे क्लिनिक सक्षम आहे.




Post a Comment

Previous Post Next Post