Kanchanjungha express accident: मालगाडीची कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक



 दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक दिली.  दोन रेल्वे गाड्यांच्या या अपघातात १० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आसाममधील सिलचर दरम्यान धावणारी कांचनजंघा एक्स्प्रेस  कोलकात्यातील सियालदहला सियालदहला जात असताना उत्तर बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ असलेल्या रंगपानी स्टेशनजवळ मालगाडीने मागून धडक दिली, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी - ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) यांनी सांगितले. कटिहार विभागीय रेल्वेनुसार या अपघातात १० प्रवासी मृत्युमुखी होण्याची तर ६० जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  



 प्राथमिक माहितीनुसार, मालगाडी मागून आदळल्याने एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. कटिहार रेल्वे विभागातील रंगपानी भागात आज सकाळी ८.४५ वाजता न्यू जलपाईगुडी जंक्शनच्या पुढे ही घटना घडली. मृतांच्या संख्येची माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याचे त्रिपुराचे परिवहन मंत्री, सुशांत चौधरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा भागात ही दुर्घटना घडली.


रेल्वेमार्फत हेल्पलाइन क्रमांक जाहीर 

एका निवेदनात, सियालदह विभागाच्या DRM ने घोषणा केली, "ट्रेन क्रमांक १३१७४ - सियालदह कांचनजंघा एक्स्प्रेसच्या मागील टक्कर संदर्भात कोणत्याही चौकशीसाठी, सियालदह येथील हेल्पलाइन क्रमांक आहेत: बीएसएनएल क्रमांक ०३३-२३५० ८७९४, रेल्वे ऑटो फोन नं. ०३३-२३८३३३८२६."





Post a Comment

Previous Post Next Post