नाल्याच्या बाहेर असलेल्या कचऱ्याच्या गाळातून नागरिक, लहान मुलांचा प्रवास
दिवा, (आरती मुळीक परब) : काल रात्री धुवाधार पडलेल्या पावसामुळे दिव्यात बऱ्याच भागात पावसाचे पाणी साठले. तर आता दिव्यात पावसात नालेसाफाई सु
ठामपा क्षेत्रातील सर्व प्रभाग समितींमध्ये नालेसफाई सुरु आहे. तर या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. याने परिसरात दुर्गंधी, रोगराई पसरणार नाही, अशा सूचना ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या होत्या. पण या आयुक्तांच्या आदेशाला दिव्यात कचऱ्याच्या टोपलीत टाकल्याचे दिसत आहे. दिव्यातील प्रत्येक नाल्याच्या सफाईनंतर त्यातील गाळ हा बाहेरच ठेवला गेल्याचे नागरिक सांगत आहेत. त्या गाळातूनच नागरिकांना चालावे लागत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती तर्फे पावसात नालेसफाईची कामे सुरु आहे. एकाच वेळी दोन तीन नाल्यातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. तर दिवा स्टेशन जवळील पूर्वेत श्लोक नगर येथील नारायण भगत परिसरात मोठ्या नाल्याची सफाई गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु आहे. पण परवा या नाल्यातून कचऱ्याचा गाळ काढण्यात आला. पण तो कचऱ्याचा गाळ लगेचच न उचलल्याने रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे तेथे गुडघाभर पाणी साचले. या गुडघाभर घाण पाण्यातून न जाता नाल्याच्या भिंतीवर चढून सकाळी नागरिक कामाला गेले आहेत. तर शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या आई वडिलांनी उचलून तेथून मार्ग काढला आहे. या नारायण भगत परिसरात अंदाजे पन्नास हजार ते दिड लाखांची लोकवस्ती आहे. तसेच या सर्वांना कामाला जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, दिवा स्टेशनला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. पण तोच नाल्याच्या कचऱ्यामुळे, घाण पाण्याने भरलेला असल्याने तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिव्यात एकाच वेळी दोन, तीन नाल्यांची सफाई सुरु आहे. आम्ही नाल्यातील कचऱ्याचा गाळ काढल्यावर एक दोन दिवस तो कचरा तसाच ठोवतो. कारण उचलून नेताना नाल्यातील कचऱ्यासोबत आलेले घाण पाणी इतरत्र पडत जाते. त्यामुळे तो पूर्ण रस्ता घाण होतो. तर त्या गाळाच्या, घाण पाण्याच्या दुर्गंधीने रोगराई पसरु शकते. तर आता पाऊस सुरु झाल्यापासून आम्ही तो कचरा तातडीने उचलून टाकतो.
डोंगर परेदशी, उप मुख्य स्वच्छता निरीक्षक,
घनकचरा व्यवस्थापन विभाग