पत्रकारांची भूमिका लोकशाहीसाठी महत्वाची : तुषार कामठे

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा कार्यकारिणीत निवड झालेल्या पत्रकारांचा सन्मान




पिंपरी (श्रावणी कामत) :  पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत विविध महत्वाच्या पदांवर बिनविरोध निवड झाल्याने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

पिंपरी -चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष, झुंज या प्रसिद्ध साप्ताहिकाचे संस्थापक व संपादक अनिल वडघुले व डिजिटल मीडियाचे पदाधिकारी चिराग फुलसुंदर यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या संघटकपदी बिनविरोध निवड झाली असून धडाडीच्या क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांची बिनविरोध महिला जिल्हाध्यक्षपदी, मारुती बानेवार व रेखा भेगडे यांची बिनविरोध जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्याने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी जाहीर सत्कार करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. 



यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे नगरसेवक सुलक्षणा शिलवंत धर, गणेश मामा भोंडवे, विनायक रणसुभे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, प्रशांत सपकाळ, योगेश सोनवणे, विवेक विधाते, विनोद धुमाळ, मनीषा शेळके, वंदना आराख, विशाल जाधव, ॲड. विजय बाबर, सागर भुजबळ, यांच्यासह सर्वच पदाधिकारी व सहकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शक उपस्थित होते.


पत्रकारिता क्षेत्र हे आम्हा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपेक्षा वेगळं नाही, जसं आम्ही दररोज संघर्ष करतो तसेच पत्रकार पण करतात, त्यामुळेच पत्रकारांची भूमिका लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्वाची असून सत्याला साथ देणारा पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आहे अशा भावना शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.




Post a Comment

Previous Post Next Post