जागतिक रेबीज डे निमित्त प्रतिबंधक लसीकरण

 



डोंबिवली, पलावा, शहाड, उल्हासनगर, विठ्ठलवाडी अंबरनाथ आणि बदलापूर येथे मोहीम 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : पिसाळलेला कुत्रा चावल्याने रेबीज रोग होतो. या भयानक रोगाविषयी लोकजागरण व्हावे तसेच त्याचे बळी ठरणारे प्राणी आणि मानव यांच्यावर इलाज करण्यासाठी 'एकच औषध' उपलब्ध असावे, या हेतूने हा दिवस २००७ पासून '२८ सप्टेंबर'ला मानला जातो. रेबिजच्या रोगाला अटकाव व्हावा आणि तो टळावा म्हणून जगभर प्रयत्न सुरू आहेत.या विशिष्ट दिवशी लसीकरण मोहीम, कुत्र्यांचे नपुसंकीकरण, धावण्याच्या स्पर्धा (रन फॉर रॅबिज), कवायती, शैक्षणिक सभासत्रे, विविध सोहळे आणि कार्यक्रम आयोजित होतात. पहिल्या रेबिज दिनाच्या कार्यक्रमावेळी ७४ देशांतील ४ लाख लोकांनी भाग घेतला होता. त्यावरून रेबिज रोगाचा सर्वसामान्य माणसाने किती धसका घेतलेला असतो, हे लक्षात येते. एकत्रित येऊन रेबिजला भूतकाळात गाडा' या सूत्राने विश्व रेबिज दिनाचे सोहळे आयोजित होतात.रेबिज हा रोग बरा होतो, तरीही जगभरात दर दहा मिनिटाने एक पेशंट या रोगाने बाधित होऊन मृत्युमुखी पडतो. दरवर्षी जगभरात ५२,५६० जण रेबिजमुळे दगावतात. यात १५ वर्ष वयोगटाखालील मुले असतात. ज्या कुत्र्यांना लस न टोचलेले नाही असे कुत्रे जर मुलांना चावले तर मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो आणि या लसीकरणाकडे जगभरात सर्रासपणे दुर्लक्ष होते. कारण या औषधाची किंमत गरीबांना परवडणारी नसते.

जगातील बर्‍याच देशांमध्ये रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. विकसनशील जगात सर्व मानवी मृत्यूंपैकी ९९% मृत्यू रेबीड कुत्रा चावल्यामुळे होतात, तर आफ्रिका आणि आशियात ९५% मृत्यू होतात. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता प्रत्येक खंडातील लोक आणि प्राणी यांना रेबीजचा धोका संभवतो.डोंबिवली, पलावा, शहाड, उल्हासनगर, विठ्ठलवाडी अंबरनाथ आणि बदलापूर येथे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आयोजित केली आहे. रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी, पॉज, इनर व्हील क्लब डोंबिवली आणि वर्ल्ड वाईड वेटरनरी सर्व्हिस ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दोन दिवस राबवला जात आहे. सुमारे ५०० च्या वर भटक्या जनावरांना ही लस टोचण्यात येणार आहे. डॉ. अश्विन आणि पॉज संस्थेचे निलेश भणगे, विद्या चव्हाण ह्यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम तयार केला आहे. सुमारे ११  कार्यकर्ते आणि २ डॉक्टर स्वेच्छेने रेबीज लसीकरण मोहीम आणि ९ इन १ ची लसीकरण मोहीम यशस्वी रित्या राबवणार आहेत.गेली २४ वर्षे पॉज संस्था रस्त्यावर उतरून भटक्या प्राण्यांचासाठी अविरत कार्य करत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात एकही माणूस रेबीज मुळे मृत्युमुखी पडले नाही असे निलेश भणगे ह्यांनी सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post