नवी दिल्ली: दिवाळी-छटपूजेला घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि गाड्यांची वाढती प्रतीक्षा पाहता रेल्वे मंत्रालयाने १० हजारहून अधिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे, तर १०० हून अधिक रेल्वे गाड्यांमधील जनरल डबे वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे सुमारे एक कोटी प्रवाशांची सोय होणार आहे.
अधिकाधिक प्रवाशांना प्रवास करण्याची संधी मिळावी यासाठी रेल्वे सुमारे १०८ गाड्यांमध्ये जनरल डबे वाढवणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान १२,५०० विशेष गाड्या चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, २०२४-२०२५ मध्ये ५,९७५ ट्रेन अधिसूचित करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, यामुळे दिवाळी आणि छठपूजेच्या गर्दीत १ कोटींहून अधिक प्रवाशांना घरी जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२३ आणि २०२४ मध्ये छठपूजेसाठी ४,४२९ विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
खरं तर, दरवर्षी दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने देशभरातून मोठ्या संख्येने लोक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातात. अशा परिस्थितीत अनेक वेळा प्रवाशांना गाड्यांमध्ये निश्चित जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा समस्या टाळण्यासाठी लोक दोन ते तीन महिने आधीच तिकीट बुक करतात. सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रेल्वे दरवर्षी विशेष गाड्या सुरू करते. यावेळीही रेल्वेमार्फत मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. जेणेकरून प्रवाशांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये.