डोंबिवलीत धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शित

 


  शिवसैनिकांचा जल्लोष, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली  ( शंकर जाधव ) : शिवसेनेचे दिवंगत नेते स्व. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर २  चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ‘धर्मवीर 2’ ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून, निर्मितीची धुरा मंगेश देसाई यांनी सांभाळली आहे. प्रसाद ओकने या चित्रपटात पुन्हा एकदा आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. डोंबिवलीत खास शिवसैनिकांसाठी मधूबन चित्रपटगृहात दुपारी १२:३० ला 'धर्मवीर २’ ची चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट पाहण्यासाठी आनंद दिघे प्रेमी आणि शिवसैनिकांनी गर्दी केली.





चित्रपट सुरू होण्यापूर्वी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. दरम्यान सर्वांनी दिघे साहेब अमर रहे अशा घोषणा दिल्या. यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, तालुका प्रमुख महेश पाटील, रणजित जोशी, संतोष चव्हाण, शरद गंभीरराव, विवेक खामकर, सागर बापट, शिवलकर,  कविता गावंड, शिल्पा मोरे, बंडू पाटील, दत्ता वझे, सागर बापट  यांच्यासह हजारोंच्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते.



चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. स्व. आनंद दिघे हे शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान होते, त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणे, हा सर्वांसाठी विशेष आनंदाचा क्षण होता अशी चर्चा होती. चित्रपटगृहाबाहेर शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी  जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, धर्मवीर दिघे पार्ट २ मध्ये सत्यता लोकांसमोर मांडली आहे. गैरसमज यातून दूर होती, बाळासाहेबांची शिकवण, विचार आणि दिघे यांची शिकवण टिकली पाहिजे. शिवसेनेचा पाया यामध्ये दाखविण्यात आला आहे. चित्रपट कधी येणार अशी मागणी होती. उत्कृष्ट चित्रपट म्हणून याची सर्वस्तरावर नोंद घेतली जाईल. सराव परीक्षा वर्गाचा मी साक्षीदार आहे. चित्रपटात एसएससी परीक्षेचे वातावरण तंतोतंत दाखविले आहे. सराव परीक्षा हा उपक्रम एकनाथ शिंदे यांनी पुढे चालू ठेवला आहे.




Post a Comment

Previous Post Next Post