ऑस्ट्रेलियन महिला संघ सातव्या जेतेपदासाठी सज्ज
युएई : ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन दुबई आणि शारजाह, संयुक्त अरब अमिराती (UAE) या दोन शहरांमध्ये ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेतील १० संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडसह सहा संघांनी गेल्यावर्षी महिला टी-२० विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे पात्रता मिळवली आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियन महिला संघाने सहा वेळा जेतेपद पटकाविले आहे तर भारतीय महिला संघ २०२० साली अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र ऑस्ट्रेलियन महिला विरूद्ध विजय मिळवता आला आहे. याआधी या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशला मिळाले होते मात्र काही कारणास्तव ही स्पर्धा युएईला हलविण्यात आली.
यंदाच्या या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद पटकाविण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय संघाची कारकिर्द पाहता त्याला ऑस्ट्रेलिया संघाचे कडवे आव्हान असणार आहे.
गतविजेता ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आठ विश्वचषक स्पर्धेत सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाने २०१० मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१४ मध्ये देखील जेतेपद कायम राखण्यास त्यांना यश आले.
२०१६ मध्ये अंतिम फेरीत हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये विजेतेपद पटकावले. २००९ मध्ये इंग्लंडने तर २०१६ मध्ये वेस्ट इंडिजने विजेतेपद पटकावले होते. आतापर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. भारतीय संघ २०२० मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता आणि ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भारतीय संघाची कर्णधार हरमणप्रीत कौरला विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावून आपला दबदबा निर्माण करण्याची उत्तम संधी आहे. भारतीय महिला संघ सध्या चांगल्या लयमध्ये असल्यामुळे त्यांना इतर संघाचे कडवे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग ही विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने चार वेळा विश्वचषक जिंकला आहे.