सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांची शाळेला उभेट
सांगली ( शेखर धोंगडे ) : सांगलीतील पंचशील नगर मध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २९ मध्ये एका शिक्षिकेने ४४ मुलांना हातावरती वन उमटेपर्यंत छडीने मारले होते. याची दखल सर्व पालकांनी व सर्व सामाजिक संस्थेने घेतली होती. यावेळेला आज सामाजिक कार्यकर्ते व प्रवक्ते संतोष पाटील यांनी शाळेला भेट देऊन सगळा प्रकार समजून घेतला.
जो प्रकार झाला होता याची सर्व माहिती प्रत्यक्षात मारहाण झालेल्या मुला मुलीकडून ऐकून घेतल्यानंतर असे वाटले की हा प्रकार कोणीतरी घडवण्याचे षडयंत्र रचले आहे किंवा ज्या शिक्षिकेने सर्व मुलांना एकाच वेळी मारले होते. त्यावेळेला ती मनोरुग्ण असू शकेल. या दोन घटनापैकी एक घटना निश्चित होऊ शकते म्हणून येथील त्या शिक्षकांना निलंबित करावे व जबाबदार हेडमास्तरला याची बदली करावी म्हणून आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना फोनवरती बोललो व त्यांना सांगितले की बदलापूरची पुनरावृत्ती या महापालिका शाळेमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येही हा प्रकार होण्याची शक्यता आहे.
या घटनामागे कोणीतरी या शिक्षण खात्याला,संस्थेला किंवा गरिबांच्या शिकणाऱ्या मुलांना बदनाम करण्यासाठी कोणीतरी षडयंत्र रचनेची शक्यता नाकारता येत नाही. या वेळेला आम्ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून पूर्ण माहिती घेतली व त्यांनी सांगितले की या शाळेमध्ये २८० विद्यार्थी आहेत आणि शिक्षक फक्त सहा आहेत. अजून चार शिक्षकांची गरज असताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासन व आयुक्त या शिक्षक भरतीसाठी लक्ष देत नाही. त्यामुळे एकाच शिक्षकेला दोन किंवा तीन वर्गावरचा भार पडत असल्यामुळे यदा कदाचित अशा घटना घडू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक भरती करावी कारण पटसंख्या जास्त असल्यामुळे व गोरगरिबांची मुली शिकत असल्यामुळे या ठिकाणी चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे अशी माहिती सर्वांनी प्रवक्ते संतोष पाटील यांना दिली.
यावर आम्ही त्यांना महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभाग प्रशासन व आयुक्त यांना भेटून यावर लवकरच तोडगा काढण्याचे त्यांना आश्वासन दिले व झालेल्या प्रकाराबद्दल कोणालाही माफ केले जाणार नाही असे सांगितले.जे जबाबदार आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ असे माननीय प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी शाळा नंबर २९ या सर्व शिक्षकांना सांगितले.