मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धकांचा उपक्रम
दिवा, (आरती परब ) : आधी तोरण गडाला...मग माझ्या घराला ... या उक्ती प्रमाणे यावर्षी ही दसरा निमित्त किल्ले कल्याण दुर्गाडी येथे महादरवाजावर ३६ कलशांचे तोरण मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक यांस कडून चढवण्यात आले. दसऱ्याच्या पहाटे देवीचे अभिषेक महारती, कलशाची पूजा करून हे तोरण महादरवाजावर चढवण्यात आले. छत्रपती शिवरायांचे पहिले आरमार असलेल्या किल्ले दुर्गाडीवर हे तोरण लावण्यात येते. नंतर पुष्प वर्षाव करून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. तर तेथे उपस्थित सर्व गड संवर्धकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या शिवकार्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद देण्यात आले. खूप उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक संस्थापक अध्यक्ष राहुल खैर, उपाध्यक्ष रोहित जाधव, कार्याध्यक्ष योगेश राणे, सेक्रेटरी अमित गुरव, खजिनदार आकाश खैर, संपर्कप्रमुख शैलेश पवार, संघटक माऊली चव्हाण, मीडिया प्रमुख अभिजीत गावडे, महिला पदाधिकारी आणि गड संवर्धक सभासद उपस्थित होते. तसेच मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे इतर सदस्या ही उपस्थित होते.