भात पीक पाण्याखाली; शेतकरी वर्ग अडचणीत
पालघर : सध्या राज्यात ऑक्टोबर हिटबरोबर पावसाचा फटका देखील नागरिकांना बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राज्यात पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान केले आहे.जिल्ह्यात ४ दिवसापासून परतीचा पाऊस मुसळधार विजेच्या कडकडाटसह कोसळत आहे. या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या भातपिकाच नुकसान केले आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नाणे गावातील दशरथ हरी पाटील गुजरात ११ जातीच्या भात वाणाची कापणी केली आहे. दत्तात्रेय हिरू पाटील,रवींद्र विठ्ठल पाटील या शेतकऱ्यांनी ही भात कापणी केलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी केलेलं भात पीक हे वाहून गेल्याने भातपिकाची कापणी थांबली गेली आहे. शेतातील वाहत्या पाण्यातून भातपीक त्यांना काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.पावसामुळे तयार झालेले भात पीक हे नुकसानीने हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात यावे नुकसानभरपाई देण्यात यावी अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात भात पीक हे प्रमुख पीक घेत असतो.भात पेरणीने,भात रोपे तयार करून भात पिकांची लागवड केली.गेल्या चार पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने भात पिकांचे नुकसान केले आहे.
शेतकऱ्यांचे तयार झालेले भातपीक हे वादळी पावसामुळे आडवे झाले आहे. तर कापणी केलेले भात पीक हे पावसाने भिजले आहे.कापणी केलेले भात पीक पावसाच्या प्रवाहाने वाहून गेले आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.