आगीच्या दुर्घटनेची आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडून पाहणी




कल्याण ( शंकर जाधव ) :  गणेश नगर येथील तिसाई चाळमध्ये शरद शाहू यांच्या घराला अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. या अनपेक्षित संकटामुळे शाहू कुटुंबावर कठीण प्रसंग ओढवला.



या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यांनी शाहू कुटुंबाशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि त्यांच्या गरजांची तातडीने पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे संकटग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.


आमदार सुलभा गायकवाड यांच्या संवेदनशील आणि झपाट्याने केलेल्या मदतीबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले. प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात याबद्दल आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्यातर्फे आदेश देण्यात आले आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post