३०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
कल्याण ( शंकर जाधव ) : 'स्वतः बनवा, विक्री करा आणि मोबदला घ्या' असा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचे महत्व समजावून देण्याकरता कल्याणात 'खरी कमाई महोत्सवातर्गत आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कल्याण येथील सूचक नाका येथील सिद्धार्थ विद्या मंदिरात पार पडलेल्या महोत्सवा प्रसंगी जिल्हा संघटक स्काऊट किरण लहाने यांनी खरी कमाई पोस्टर प्रकाशित केले. यावेळी लहाने यांनी विद्यार्थ्यांना कमाईबाबतचे महत्त्व काही उदाहरण देऊन पटवून दिले. यावेळी स्काऊटस् गाईडस् व पालकवर्ग उपस्थित होते.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या शेवाळे, कोमलसिंग राजपूत, कल्याण स्थानिक संस्थेचे समुपदेशक सपकाळे सर, तडवी उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या प्राचार्या शेवाळे यांनी उपस्थितांचे तुळस रोप देऊन स्वागत केले. तर कार्यक्रमांचे आयोजन व संचालन कल्याण भारत स्काऊटस् आणि गाईडस् स्थानिक संस्थेचे खजिनदार, व शाळेचे उत्कृष्ठ स्काऊट मास्तर प्रविण खाडे यांनी केले.