संघर्ष समितीच्या जाहिर सभेत निर्णय
डोंबिवली ( शंकर जाधव ) : २७ गावातील अनेक समस्या सुटव्यात याकरता संघर्ष समितीने शासन दरबारी पाठपुरावा केला. समितीच्या पाठपुराव्याला यश आले आणि अनेक प्रश्न सुटलेली.समितीच्या अध्यक्ष पद दुसऱ्याकडे आहे असे भासवून दिले जात असून यात काहीही तथ्य नाही. संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलारच आहे हे या रविवारी मानपाडेश्वर मंदिराच्या आवारात आयोजित केलेल्या सभेत सर्वानुमते जाहीर करत असल्याचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले. तर या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मीच अध्यक्ष असल्याचे गंगाराम शेलार यांनी सांगितले.
या सभेत संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, पदाधिकारी गुलाब वझे, गजानन मंगरुळकर, एकनाथ मामा पाटील, राजेश मोरे, महेश पाटील, सुनिता पाटील, अर्जून पाटील, बंडूशेठ पाटील, दत्ता वझे, बाळाराम ठाकूर, भास्कर पाटील, शरदबुवा पाटील, विजय पाटील, मनोहर काळण, रमेश पाटील, सुभाष पाटील, तेजस पाटील, जयवंत माळी, गणेश महाराज, सुदामबुवा पाटील, नकुल गायकर, ब्रम्हा माळी, रवी पाटील, गजानन पाटील (निळजे), निवृत्ती पाटील, सचिन म्हात्रे, शरद पाटील,अभिमन्यू म्हात्रे, आकाश देसले, नितीन माळी, नंदु खंडाळे, विलास भोईर, जयेश माळी, समर वझे, भानुदास पाटील यांच्यासह संघर्ष समितीचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणिकल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मुळेच २७ गावातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. हे प्रश्न सुटण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार गेली अनेक वर्षे अविश्रांत काम करीत आहेत. त्यामुळे यापुढे संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलारच राहतील असा एकमुखी निर्णय सर्व पक्षिय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या श्री मानपाडेश्वर मंदिरातील झालेल्या रविवारी सायंकाळी बैठक पार पडलेल्या जाहीर सभेत सर्वानुमते घेण्यात आला.
तर सभेत उपस्थित मान्यवर म्हणाले कि, गेले काही दिवस २७ गांव सर्व पक्षीय हक्क संरक्षण समितीमध्ये उलट-सुलट चर्चेमुळे विपर्यास करून घेण्यात आला. विद्यमान अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी राजीनामा द्यावा असा आग्रह काही मंडळींकडून करण्यात आला. परिणामी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा ) यांना अपुरी माहिती देऊन, काही व्यक्तींनी त्यांच्या गळ्यात बेकायदेशीरपणे संघर्ष समितीची माळ घातली असल्याचा आरोप समितीच्या बैठकीत करण्यात आला.परंतु हा बेबनाव संघर्ष समितीला व गंगाराम शेलार यांना पटलेला नसून याविषयी जाहीर सभा घेण्यात आली. याच सभेत गंगाराम शेलार हेच अध्यक्ष राहतील असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
गंगाराम शेलार म्हणाले, गेली अनेक वर्षे संघर्ष समितीच्या माध्यमातून २७ गावातील कामे पूर्ण झाली आहेत, तर काही होणार आहेत. त्यामुळे काही व्यक्ती त्यात खो घालण्याचा प्रयत्न करतात. लोकांच्या इच्छेखातर मी अध्यक्ष राहणार आहे. संघर्ष समितीत फूट पडावी अशी काही लोकांची धारणा आहे.
उपाध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, खासदार सुरेश म्हात्रे हे आगरी समाजाचे खासदार आहेत. त्यांच्या बाबत आम्हाला नितांत आदर आहे. मात्र त्यांना काहींनी अपुरी माहिती देऊन अध्यक्ष म्हणून निवड केली असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामुळे ९०० कोटींचा कर माफ झाला, संत सावळाराम स्मारक समाज भवनासाठी जागा उपलब्ध करुन दिली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि खासदारांचे आभार मानलेच पाहिजेत असे उपस्थितांना सांगितले. बैठकीत कमी केलेल्या मालमत्ता कराच्या बिलांची छानबीन करणे, जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न, ग्रामपंचायत पैकी ४९९ कामगारांना महापालिकेत कायम करण्याबाबच्या अंतिम अध्यादेश मंजूर करुन घेणे, अंतिम टप्प्यात आलेल्या अमृत योजनेचा आढावा घेणे, घरांची दस्त नोंदणी (रजिस्ट्रेशन)सुरु करणे अशी २७ गावातील विकास कामे आणि मूलभूत सुविधा या विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली. सभेत बंडु पाटील, ऍड. ब्रह्मा माळी, भानुदास पाटील आणि इतर वक्त्यांनी आपले विचार मांडले. या जाहीर सभेत प्रस्ताविक गजानन मांगलुळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद पाटील व्यक्त केले.