दिवा, (आरती मुळीक परब) : राज्यात कांद्याचे भाव वाढत असताना दिव्यातील बाजारपेठेत ६० ते ७० किलो कांदा विकत असल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यामुळे आज दिव्यात भाजपकडून स्वस्त दरात कांदा, चणाडाळ विक्री करण्यात आली.
वाढत्या महागाईमुळे कांदा, टोमॅटो आणि डाळींच्या किमती गगनाला भिडल्या असताना सामान्यांना त्या विकत घेता येत नाहीत. त्यामुळे त्यांचे मासिक बाजारहाटाचे बजेट कोलमडते. तसेच केंद्र सरकारकडून नागरिकांना परवडण्या जोग्या दरात कांदा, चणाडाळ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दिवा भाजपाकडून आज गृहींणींसाठी स्वस्त दरात कांदा, चणाडाळ विक्री केली गेली. दिव्यातील एन. आर. नगर येथे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप ठाणे युवा मोर्चा सरचिटणीस सतीश केळशीकर आणि भाजप दिवा शहर महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत यांच्या हस्ते महिलांना ४ किलो कांदा शंभर रुपयात तर १ किलो चणाडाळ साठ रुपयात देण्यात आली.
त्यावेळी ठाणे जिल्हा चिटणीस विजय भोईर, ठाणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सतिश केळशिकर, दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण, दिवा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत, भाजप सदस्या मीनाक्षी केळशीकर, समिता घाग, वैशाली शेलार, सुषमा देवरुखकर, सचिन भेरे, संजय सिंग, तुषार गायकर, कमलेश पाटील, नवनाथ देशमुख, मयूर जाधव, रीना देशमुख उपस्थित होते.