डोंबिवली ( शंकर जाधव ): डोंबिवली पश्चिमेला स्टेशन बाहेरील परिसर अनेक वर्षांपासून फेरीवाला मुक्त आहे. तरी काही फेरीवाल्यांनी रस्ता अडवून बस्तान मांडण्याचा प्रयत्न करत असताना पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाने अशा फेरीवाल्यांवर कारवाई केली.रस्ता अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना पाहून फेरीवाले पळून गेले. फुटपथाही अतिक्रमण विभागाने मोकळे केले.
पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'ह' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त स्नेहा करपे, पथकप्रमुख विजय भोईर व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.इतकी वर्षे डोंबिवली पश्चिमेला स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्यास यश आल्याने डोंबिवलीकरांकडून कौतुक होत आहे.कारवाईत सातत्य राहील असे पथकप्रमुख विजय भोईर यांनी सांगितले.