कल्याण ( शंकर जाधव ) : कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजपने राज्यभर आंदोलने करत आहेत. कल्याण जिल्हा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी ,मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी प्रियांक खर्गे यांच्या प्रतिकातक फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आता गप्प का असा सवाल यावेळी भाजपने उपस्थित केला. यापुढे जर सावरकरांचा अपमान कुणी केला तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल व त्यांना त्यांची औकात दाखवू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
Tags
महाराष्ट्र