कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण पश्चिम येथील सिंधिकेट परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यशाळेत भीषण आग लागल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत दोन बस जळून खाक झाल्या.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे चार बंब घटनास्थळी ₹दाखल झाले.दोन तासाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.आग लागल्याचे कारण समजू शकले नाही.