हुल्लडबाज तरुणाला कंटाळून ग्रामस्थांकडून रिंगरोड बंद

Maharashtra WebNews
0

 कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण पश्चिमेकडील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीए च्या माध्यमातून रिंगरोड तयार होत आहे. या रस्त्याचा अंतर्गत वापर वाहनचालकाकडून केला जात असला तरी दुर्गाडी जवळील डंपिंग ग्राऊंड हटलेले नसून अनेक ठिकाणी जागेच्या वादात रस्ता रखडला आहे. मात्र या रस्त्यावर  स्टंटबाज तरुणांकडून पार्ट्या होत असून धूम स्टाइलने दुचाकीच्या रेस लावली जाते. यामुळे पादचारी भयभीत झाले असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.  

या तरुणांच्या हुलल्डबाजीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना देखील त्रास सहन करावा लागतो.याला कंटाळलेल्या वाडेघर ग्रामस्थांनी चक्क रस्ता बांबू बांधून वाहतुकीसाठी बंद केला आहे. वाडेघर कडून दुर्गाडीकडे जाणारा रिंगरोड हुलल्डबाज तरुणांच्या जाचाला कंटाळून हा रस्ता बंद करत असल्याचे बॅनर रहिवाशांनी लावले आहेत. या रस्त्याच्या दुभाजकावर मद्याच्या बाटल्याचा खच पडला असून नशेत वाहने चालविल्यामुळे वाहनांच्या आपघाता नंतर पडलेल्या काचा देखील या तरुणांची हुलल्डबाजी दाखवून देत असल्याने वाहतूक विभागासह पोलिसांनी या हूल्लडबाज तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी नगरिकांकडून केली जात आहे.

याबाबत स्थानिक नागरिक चिंतामण निळजेकर म्हणाले, तरुण अतिशय वेगाने गाड्या चालवतात. अनेक अपघात त्यांच्या गाड्यांमुळे झाले आहे. अपघात ग्रस्तांना वाचविण्यासाठी आम्हालाच धावावे लागतात. गर्दूल्ले वाद घालतात. चालणाऱ्या लोकांना धक्का मारून त्याच वेगाने दुचाकी चालक पळून जातात त्यांना यांवर घालण्यासाठी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. आता दुर्गडी डंपिंगकडून रस्ता बंद असताना इकडे दुचाकी चालकानी इकडे गाड्या चालविण्याचा प्रश्नच नाही. रस्त्यात पथडिवे फोडून अश्लील चाळे सुरू असतात यामुळे गावातील नागरिकांना तोंड लपून रस्त्याने जावे लागते यामुळेच कंटाळून हा निर्णय घेतल्याचे सांगितले.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)