डोंबिवली रासरंग - २०२४ नवरात्री उत्सवात पार पडली देवीची महाआरती..

Maharashtra WebNews
0

 



डोंबिवली (आरती मुळीक परब) :  डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन प्रस्तुत आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली आयोजित '' डोंबिवली रासरंग - २०२४ '' दांडिया उत्सवाचा आजचा तिसरा दिवस खास ठरला. आज उत्सवाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या गरबा रसिकांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तर आजची देवीची आरती अत्यंत खास ठरली. यावेळी देवीची सर्वांनी महाआरती - गंगाआरती केली. सर्वांना सुख समाधान प्राप्त कर असे मागणे यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी मागितले. 


आजच्या या देवीच्या आरतीला आणि उत्सवाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) मा.ना.श्री. रवींद्र जी चव्हाण साहेबांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर आज सर्व गरबा रसिकांना रात्री १२ वाजेपर्यंत दांडिया खेळून उत्सव साजरा करता येणार असल्याची आनंदवार्ता खासदार डॉ.शिंदे यांनी दिली. यावेळी सर्वांनी एकच जल्लोष साजरा केला.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)